
सोलापूर : राज्यातील २० लाख ३७ हजार २१० शेतकऱ्यांकडे बॅंकांची ३१ हजार २५४ कोटींची थकबाकी असल्याची बाब राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात बीड, जालना, बुलडाणा, नांदेड, परभणी व यवतमाळ या जिल्ह्यांतील दीड लाख ते सव्वादोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांवर सर्वांत जास्त बोजा आहे. सरकारकडून कर्जमाफीची आशा असल्याने शेतकरी सध्या बॅंकांची थकबाकी भरत नसल्याची स्थिती आहे.