

Ajit Pawar’s Demise Changes Campaign Strategy, Big Leaders’ Visits Uncertain
Sakal
सोलापूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारास ब्रेक लागला आहे. पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याने राज्यस्तरावरील अनेक नेते प्रचारास येण्याची शक्यता धूसरच दिसते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकही प्रचार सभा घेणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर नेत्यांच्याही जिल्ह्यात सभा होणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामुळे प्रचाराची भिस्त स्थानिक आजी-माजी आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांवरच असणार आहे.