
Lok Adalat clears ₹101 crore worth cases; 18,634 disputes resolved through compromise.
Sakal
सोलापूर : लोकअदालतीत एकूण एक लाख चार हजार प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी आली होती. त्यातील १८ हजार ६३४ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून वेगवेगळ्या संस्था व विभागांची १०१ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे. लोकअदालतीत तीन पक्षकारांनी ऑनलाइन तथा व्हॉट्सॲपवरील व्हिडिओ कॉलवरून सहभाग नोंदवला.