Madha Lok Sabha 2024 : करमाळा मतदारसंघ बदलू शकतो माढ्याची गणितं; महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा

माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
Madha Lok Sabha 2024
Madha Lok Sabha 2024eSakal

माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याबाबत नारायण पाटील यांना विचारणा देखील झाली आहे. त्यामुळे २०१९ ला आमदार संजय शिंदे यांनी आयत्यावेळी लोकसभा लढवून सर्वांनाच धक्का दिला होता. त्याचप्रमाणे याहीवेळी माढा लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू करमाळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाची गणिते करमाळा विधानसभा मतदारसंघ बदलू शकतो.

- अण्णा काळे

माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. सध्या करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप व ज्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला, त्या रश्मी बागल या भाजपसोबत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले माजी आमदार नारायण पाटील यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्या आमदार पाटील यांच्या कार्यालयात तालुक्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांचे बैठका सत्र सुरू असून लवकरच नारायण पाटील हे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून नारायण पाटील यांना लोकसभा लढविण्यासंदर्भात विचारणा करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सध्या करमाळा तालुक्यात धैर्यशील मोहिते-पाटील त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते-पाटील यांचे दौरे सुरू आहेत. धैर्यशील मोहिते-पाटील देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी घेतल्यास त्यांना करमाळा मतदारसंघातून चांगली मताधिक्य मिळू शकते. धैर्यशील मोहिते-पाटील उमेदवार असल्यास नारायण पाटील यांची सर्व ताकद त्यांच्या पाठीशी असणार आहेत. तर आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप व रश्मी बागल या येणाऱ्या काळात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

सध्या रश्मी बागल यांनी कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेतली आहे. आमदार संजय शिंदे यांच्या कार्यालयात देखील कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे. तर लवकरच माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कार्यकर्त्यांची खासदार नाईक-निंबाळकर बैठक घेणार आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हे तीनही नेते खासदार नाईक निंबाळकर यांच्यासाठी भाजपच्या व्यासपीठावर असणार आहेत. या तीनही नेत्यांची ताकद करमाळ्यातून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी असणार आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघाला माढा तालुक्यातील ३६ गावे जोडलेले असून या ३६ गावांमध्ये आमदार संजय शिंदे यांची ताकद मोठी आहे. या ३६ गावात एकूण मतदानापैकी साधारणपणे ६५ ते ७० टक्के मतदान हे आमदार शिंदे यांच्या पाठीशी आहे.

Madha Lok Sabha 2024
Madha Lok Sabha 2024 : माढ्यात उमेदवार देण्याची घाई नाही.. शरद पवारांच्या संयमात विजयाची रणनीती!

महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य देऊन चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. करमाळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे सर्वाधिक मतदान घेतील.

- संजय शिंदे, आमदार, करमाळा

करमाळा विधानसभा मतदारसंघातील गावोगावच्या कार्यकर्त्यांशी बोलणी सुरू असून, लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. आम्ही ज्या उमेदवाराचे काम करू त्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य आम्ही मिळून देऊ. मला महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीबाबत विचारणा झाली असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असून, ही चर्चा खरी आहे.

- नारायण पाटील, माजी आमदार, करमाळा

करमाळा मतदारसंघातून चुरस

महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील व सांगोल्याचे डॉ. अनिकेत देशमुख या तिघांपैकी एक उमेदवार दिला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, मोहिते- पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची जास्त शक्यता आहे. मोहिते- पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहिल्यास आमदार संजय शिंदे हे आपली मोठी ताकद नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी लावतील तर नारायण पाटील हे मोहिते-पाटील यांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे करमाळा विधानसभा मतदारसंघातून चुरशीने मतदान होऊ शकते.

आकडे बोलतात (२०१९च्या निवडणुकीतील पक्षनिहाय पडलेले मतदान)

भाजप : ७१५०३

राष्ट्रवादी : १०१९३२

Madha Lok Sabha 2024
Solapur Lok Sabha 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघात रामराज्य येणार? सातपुतेंच्या विजयात राहणार शिवसेनेचा निर्णायक वाटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com