Solapur Lok Sabha Poll : निवडणुकीची वातावरण निर्मिती करण्यावर काँग्रेसचा भर

सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात २००९ मध्ये पहिल्यांदा भाजपने बाजी मारली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ही सलग दुसऱ्यांदा भाजपने विजय मिळवला. दोन्ही वेळीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला.
Solapur Lok Sabha Poll
Solapur Lok Sabha PollSakal

Solapur Lok Sabha Election : सोलापूर लोकसभा मतदार संघावर सलग दहा वर्षे भाजपची सत्ता असूनही भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. तर दुसरीकडे सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे या जोमाने कामाला लागल्या आहेत. मागील पंधरा दिवसांपासून त्यांचे पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यात दौरे वाढले आहेत.

कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा निवडणूक जिंकायची या ईर्षेने त्या मैदानात उतरून तयारीला लागल्या आहेत. तर विरोधी भाजपमध्ये मात्र अजूनही कमालीची शांतता असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्यातरी काँग्रेसने वातावरण निर्मितीमध्ये आघाडी घेतली आहे.

- भारत नागणे

सोलापूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात २००९ मध्ये पहिल्यांदा भाजपने बाजी मारली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ही सलग दुसऱ्यांदा भाजपने विजय मिळवला. दोन्ही वेळीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला.

वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. आमदार शिंदे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे.

मागील आठ दिवसापूर्वी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील गावांचा दौरा करून स्थानिक शेतकरी, कामगार आणि महिलांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. सध्या त्या पंढरपूर तालुक्यातील गावांना भेटी देवून लोकांशी संवाद साधत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये लढाई जिंकायची, असा निर्धार त्यांनी केला आहे.

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची पंढरपूर - मंगळवेढ्यातील जनतेशी अजूनही नाळ घट्ट आहे. आजही शिंदे यांचे कार्यकर्ते गावागावात आहेत. त्याचा फायदा त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांना होईल, अशी त्यांना खात्री आहे.

दुसरीकडे विरोधी भाजपचा अजूनही उमेदवार ठरता ठरत नाही. दररोज एकजणाचे नाव चर्चेत येत आहे. सलग दहा वर्षे सोलापूरमध्ये भाजपची सत्ता असतानाही आता उमेदवार शोधण्याची वेळ भाजपवर आली आहे. त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे.

त्यातच भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या सुमार कामगिरीमुळे दोन्ही तालुक्यातील मतदार भाजपवर नाराज आहेत. महागाई, बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता, शेतीमालाचा हमीभाव,

मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न यावरुन काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारला लक्ष केले आहे. सध्यातरी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात प्रणिती शिंदे यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरूनही आमदार शिंदे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

अभिजित पाटलांमुळे प्रणिती शिंदेंना बळ

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात कार्यकर्त्यांचे चांगले संघटन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांना अभिजित पाटील यांच्या संघटन कौशल्याचा चांगला फायदा होणार आहे.

अभिजित पाटील हे विधानसभेसाठी पंढरपुरातून इच्छुक आहेत. त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपचा उमेदवार अजूनही निश्चित झाला नसल्याने आमदार समाधान आवताडे व प्रशांत परिचारक हे देखील शांत आहेत.

आकडे बोलतात (पंढरपूर विधानसभा २०२१) पोटनिवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते)

  • भाजप : ७७,९३९

  • राष्ट्रवादी : ८४,१३५

  • वंचित : २६,८७०

भाजपने अजूनही उमेदवार जाहीर केला नाही. लवकरच सक्षम उमेदवार जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. उमेदवार कोणी ही असला तरी लोकांच्या मनात पंतप्रधान मोदी आणि कमळ रुजले आहे. त्यामुळे भाजपला विजयाची चिंता नाही.

गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो विकास केला आहे. तो लोकांच्या लक्षात आहे. गोरगरीब लोकांना मदत केली, शेतकऱ्यांना आर्थिक सहायक केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांचा पाणी प्रश्न सोडवला आहे. वर्षभरात उपसासिंचन योजनेचे काम पूर्ण होईल, ही बाब देखील विचारात घेतली जाईल. त्यामुळे भाजप पुन्हा विजयी होणार, याच शंका नाही.

- समाधान आवताडे, पंढरपूर-मंगळवेढा, आमदार

अद्याप कोणत्याही पक्षाचा उमेदवार निश्चित झाला नाही. संभाव्य उमेदवार म्हणून काही जण मतदार संघातील लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत. भालके गटाची भूमिका अजून जाहीर केलेली नाही. लवकरच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येईल. त्या बैठकीमध्ये जो सर्वानुमते निर्णय होईल, तो त्यावेळी जाहीर केला जाईल. सध्यातरी आमची भूमिका जाहीर केलेली नाही.

- भगीरथ भालके, बीआरएस नेते, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com