

Farmer-Friendly Initiative by Vikrant Patil at Lokanete Sugar Factory
Sakal
मोहोळ : कागदावरचा ऊसतोडणी कार्यक्रम व प्रत्यक्षात शेतावरील तोडणी यात काय फरक आहे? यंत्राने ऊस तोडताना यंत्रचालक व उत्पादक शेतकरी यांच्या काय अडचणी आहेत? ज्या आहेत त्यावर काय उपाय योजना करता येईल का? यासाठी लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी हार्वेस्टरच्या माध्यमातून थेट शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ऊस तोडला. कारखान्याचा अध्यक्ष थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून स्वतः ऊस तोडतो हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.