Rajan Patil : राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 6 हजार कार्यकर्ते सोलापुरला जाणार

सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मंगळवार ता 16 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार.
Rajan Patil
Rajan Patilsakal

मोहोळ - सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा मंगळवार ता 16 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) शिवसेना (मुख्यमंत्री शिंदे गट) व भाजपा यांच्या माध्यमातून सुमारे 6 हजार कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, शिवसेना जिल्हाप्रमुख चरण राज चवरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी मोहोळ तालुक्याचे शक्ती प्रदर्शन होऊ शकते.

या संदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार पाटील म्हणाले, मोहोळ विधानसभा मतदार संघातून तसेच या मतदार संघाला जोडलेल्या पंढरपूर व उत्तर सोलापूर तालुक्यातून ही कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार आहेत. आम्ही युतीचा धर्म पाळणार असून, निस्वार्थी पणे उमेदवार निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

दरम्यान मला आमदार किंवा अन्य कुठलीही सत्ता नको. सिना- भोगावती जोड कालवा, सिना नदीवर बंधारे व अनगर आणि दहा गावासाठी पाणीपुरवठा योजना ही शेतकऱ्यांच्या कामांच्या अपेक्षा आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराव चवरे म्हणाले, उमेदवार आमदार राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास जाण्यासाठी आमच्याही कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केली असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उद्या सोलापूरला येणार आहेत.

भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण व विधानसभा निवडणूक प्रमुख रमेश माने म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या आमदार सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापूरला येणार असून, त्यांच्या समवेत अन्य नेते ही असणार आहेत. त्यामुळे उद्या मोहोळ तालुक्याचे शक्ती प्रदर्शन होणार अशी चर्चा सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com