

Pandharpur’s Lord Vitthal Temple closed for 24 hours after Kartiki Prakshal Pooja; Rajopchar rituals begin inside sanctum.
Sakal
पंढरपूर : कार्तिकी यात्रा संपल्यानंतर आज श्री विठ्ठल रुक्मिणीची विधीवत प्रक्षाळ पूजा मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे व शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते करण्यात आली. रविवारीपासून (ता. ९) श्री विठ्ठल रुक्मिणीचे २४ तास दर्शन बंद झाले असून देवाचे राजोपचार सुरू करण्यात आले आहेत.