esakal | पावसाच्या नोंदीत तफावत; नुकसान मात्र शेतकऱ्यांचे

बोलून बातमी शोधा

Loss of farmers due to rainfall in Mangalvedha taluka

आमदार भारत भालके विधानसभेत आक्रमक
तालुक्यातील तीन महसूल मंडळाला बजाज कंपनीने वगळल्याच्या कारणावरून आमदार भारत भालके विधानसभेत आक्रमक होत हवामानावर आधारीत असलेला डाटा सार्वजनिक केला नाही. पुराच्या पाण्यात काही यंत्रणा असताना देखील विमा कंपनी व कृषी खात्याने संगनमताने तालुक्यातील शेतकर्‍यावर केला. यापूर्वी पिकविम्यावर सभागृहात चर्चा झाली, आता शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा.

पावसाच्या नोंदीत तफावत; नुकसान मात्र शेतकऱ्यांचे
sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील निकष ठरविण्यासाठी तालुक्यामध्ये असलेल्या हवामान आणि महसूल खात्याच्या पर्जन्यमापकवर  नोंदवलेल्या पावसाच्या आकडेवारी तफावत आहे. कोणाच्या आकडेवारीवरून विमा कंपनीने भरपाई दिली हे सांगत नसल्यामुळे फळपीक शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजने तालुक्यातील सात महसूल मंडळमधून जवळपास 9373 शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यामध्ये आंधळगाव 1098 , बोराळे 256, मारापूर 935, हुलजंती 4127  अशा सहा हजार 416 शेतकऱ्यांना भरपाई दिली. त्यामधील मरवडे 1132, मंगळवेढा 570, भोसे 1355 शेतकऱ्यांना वगळण्यात आले. आंधळगाव, हुलजंती, बोराळे या महसूल मंडलमध्ये अतिवृष्टी तर मारापूर मंडलमध्ये कमी पाऊस या कारणास्तव भरपाई दिली. वास्तविक पाहता ऑक्टोबरमधील अवकाळीचा फटका तालुक्याला बसला. नुकसानीचे पंचनामे तहसील व कृषी खात्याने रब्बी पिकाबरोबर करून काही फळपीक धारकाला भरपाई दिली. परंतु पंचनामे करताना विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विमातून भरपाई मिळणार असल्याचे सांगत काही फळपीक शेतकरी वगळण्यात आले. पण विमा कंपनीने भरपाई निश्चित करण्यापूर्वी अवकाळी पावसात नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्या आपल्या प्रतिनिधी पाठवून याबाबत माहिती घेणे अपेक्षित होते. सरकार निर्णयातील पावसाचा खंड आणि अति पाऊस व त्याबाबतचा कालावधी या निकषाचा आधार घेतल्यास आणखीन शेतकरी पात्र होऊ शकतात. परंतु उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार विमा कंपनीने केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र मदती पासून वंचित राहावे लागले. याबाबत ‘सकाळ’ने उठवला. 

सात महसूल मध्ये जून ते डिसेबर मध्ये नोंदवलेला पाऊस मि. मी. पुढीलप्रमाणे
हवामान खात्याकडे :
मंगळवेढा 552, मरवडे 414, बोराळे हुलजंती 596, आंधळगाव 577, भोसे 662, मारापूर 530.

महसूल खात्याकडे : मंगळवेढा 465.4, मरवडे 307,   बोराळे 520, हुलजंती 276, आंधळगाव 318.5, भोसे 256, मारापूर 194

आमदार भारत भालके विधानसभेत आक्रमक
तालुक्यातील तीन महसूल मंडळाला बजाज कंपनीने वगळल्याच्या कारणावरून आमदार भारत भालके विधानसभेत आक्रमक होत हवामानावर आधारीत असलेला डाटा सार्वजनिक केला नाही. पुराच्या पाण्यात काही यंत्रणा असताना देखील विमा कंपनी व कृषी खात्याने संगनमताने तालुक्यातील शेतकर्‍यावर केला. यापूर्वी पिकविम्यावर सभागृहात चर्चा झाली, आता शासनाने यामध्ये हस्तक्षेप करावा.

पर्जन्यमापक यंत्रणा महसूल स्तरावर

तालुक्यात पडलेल्या पावसाच्या नोंदीबाबत कृषी आणि महसूल खाते यांच्यात समन्वय असावा पर्जन्यमापक यंत्रणा महसूल स्तरावर न ठेवता गावनिहाय ठेवण्यात यावी. पावसाच्या नोंदी बाबतची माहिती दरमहा सार्वजनिक करण्यात यावी. आणि विमा भरण्यापुर्वी शासनाने जीआरव्दारे निश्चित केलेली सूचना शेतकऱ्यांना अगोदर द्यावी.
- अॅड. राहूल घुले, अध्यक्ष, युवा आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना, पश्चिम महाराष्ट्र

विमा कंपनीने भरपाई निश्चित

विमा कंपनीने भरपाई निश्चित करण्यापूर्वी कृषी व महसूलकडून स्थानिक नुकसान ग्रस्त परिस्थितीची माहिती घेवून भरपाई निश्चित करावी. नुकसानाची स्थिती शेवटच्या टोकावरील दोन गावात सारखीच असताना केवळ दुसऱ्या महसूलमध्ये असल्याने भरपाईपासून वंचीत रहावे लागले.
- आप्पा बंडगर,  मारोळी