
फुप्फुसात संसर्ग पोहोचण्याचे प्रमाण कमी
सोलापूर : कोविडची तिसरी लाट(third wave of corona) जोरात सुरु झाली असली तरी यावेळी फुप्फुसात (lungs infection)संसर्ग जाण्याचे प्रमाण मात्र कमी आहेत. सौम्य लक्षणे असल्याने घरीच थांबून रुग्ण बरे होत आहेत. ही स्थिती दिलासादायक असली तरी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचा नियम व लसीकरण प्रभावी आहे. कोविडची तिसरी लाट वाढत्या थंडीसोबत सुरु झाली आहे. रुग्णांची संख्या देखील चांगलीच वाढू लागली आहे. जे रुग्ण कोरोनाची लक्षणे असल्याने उपचारासाठी येत आहेत. त्यांच्या बाबतीत लक्षणांची तिव्रता सौम्यच आहे. तसेच फुप्फुसापर्यंत संसर्ग पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. केवळ गळ्यात खवखव, सर्दी (cough)आदी लक्षणे प्राधान्याने दिसून येत आहेत. बहुतांश रुग्णांना अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम कि कोरोना संसर्ग यातील फरक देखील करता येत नाही. (Omicron Infection in Lungs)
हेही वाचा: सोलापूर : तरुणाने बनवली बॅटरीवर चालणारी सायकल
या लाटेती संसर्गाची तिव्रता अगदीच कमी असल्याने जवळपास ८४ टक्के लोक हे घरीच बरे होत आहेत. त्यांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरची मदत त्यासाठी होत आहे. अगदीच निवडक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत. तसेच त्यांचा बरे होण्याचा वेग चांगला आहे. रुग्णांचा बरे होण्याबद्दलचा आत्मविश्वास देखील चांगला आहे. ही लाट फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सर्वाधिक संसर्गावर पोहोचेल व नंतर ही लाट हळूहळू ओसरु लागेल, असे मानले जाते.(Omicron News Updates)
हेही वाचा: निर्भया'ची टळणार पुनरावृत्ती! अंकिताचा 'सूट' करणार महिलांचे रक्षण
लसीकरण व एसएमएस सर्वात प्रभावी
विषाणू हे त्यांच्या संरचनेमध्ये सातत्याने बदल (म्युटेशन किंवा उत्क्रांती) करत असतात. त्यामुळे हा बदल झालेले विषाणुंचा(corona virus) संसर्ग वाढला तर फार मोठा परिणाम करू शकतो. त्याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. तसेच डेल्टा विषाणू संसर्ग देखील धोकादायक असू शकतो. या स्थितीत लसीकरणासोबत सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टन्स(3 rules of corona) हे नियम पाळणे हाच योग्य पर्याय असू शकतो.
Web Title: Lowering The Risk Of Infection In The Lungs For Omicron Varient In Solapur News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..