Solapur News : लम्पीच्या १०० जनावरांवर उपचार सुरू; जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली माहिती
Lumpy Virus Outbreak : जिल्ह्यात सुमारे ९०० जनावरांना लम्पीची लागण झाली. सोलापूरसह राज्यभरात लम्पीची साथ आल्याने पशुसंवर्धन आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने लम्पीची लागण झालेल्या जनावरांवर उपचारासह त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
Veterinary teams in action: Treatment underway for 100 cattle infected with lumpy skin disease, says District Animal Husbandry Department.Sakal
सोलापूर : जिल्ह्यात सुमारे ९०० जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे आढळून आले होते. पशुपालकांनी घेतलेली काळजी व पशुसंवर्धन विभागाकडून उपचारानंतर लम्पी नियंत्रणात आली असून आणखी १०० जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली.