Madha Lok Sabha : माढ्याबाबत जनतेला अपेक्षित निर्णय लवकरच; धैर्यशील मोहिते-पाटील यांचे सुतोवाच

गेल्या पाच वर्षांत मोहिते-पाटील व रणजितसिंह यांच्यातील संबंध टोकाचे बिघडले. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास मोहिते-पाटलांचा विरोध होता.
Dhairyashil Mohite Patil
Dhairyashil Mohite PatileSakal

Madha Lok Sabha 2024 : माढा लोकसभेच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच युद्धभूमी तयार करण्याचे काम धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल व आज माण व फलटण मतदारसंघाचा दौरा करत प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीनंतर जनतेला अपेक्षित असलेला निर्णय लवकरच घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांचे हे विधान म्हणजे माढा मतदारसंघामध्ये तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपासून फारकत घेत मोहिते-पाटील घराने भाजपची कास धरली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नेटाने काम केले. त्यांच्या मताधिक्याच्या जोरावरच राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला; परंतु गेल्या पाच वर्षांत मोहिते-पाटील व रणजितसिंह यांच्यातील संबंध टोकाचे बिघडले. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास मोहिते-पाटलांचा विरोध होता.

त्यातून भाजपची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी धैर्यशील यांनी आपली प्रचार मोहीम सुरू केली होती. त्याला भाजपने साथ दिली नाही. त्यामुळे मोहिते-पाटील कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याचा आग्रह केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट झाली. या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही, तसेच उमेदवारीबाबतही अद्याप काही जाहीर झालेले नाही.

Dhairyashil Mohite Patil
Sharad Pawar : फलटण की अकलूज? माढ्याच्या उमेदवारीबाबत पवारांचे संकेत; संजीवराजे-धैर्यशील तुतारी हाती घेणार?

पवार यांची भेट घेतल्यानंतर काल व आज धैर्यशील यांनी माढा मतदारसंघातील माण व फलटण या तालुक्यांत ठाण मांडले आहे. या दोन दिवसांत त्यांनी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन लढाईच्या सोंगट्या मांडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. काल त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते शेखर गोरे यांची त्यांच्या कुळकजाई येथील आर्यन फार्म हाऊसवर भेट घेतली. या वेळी फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकरही त्यांच्या सोबत होते. महाविकास आघाडीकडून लढले, तर महादेव जानकर यांना निवडून आणण्याची गॅरंटी गोरे यांनी घेतली होती; परंतु जानकरांनी महायुतीत जात परभणीची वाट धरल्यावर त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीने आम्हाला गृहीत धरू नये, अशी भूमिका बदलली होती.

राष्ट्रवादीने वेळोवेळी केलेल्या अन्यायाचा पाढाही नुकताच वाचला होता. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील व गोरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्याचबरोबर काल दहिवडी येथे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांच्या मुलाचा विवाह होता. या समारंभासही त्यांनी हजेरी लावली. तेथे त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते प्रभाकर देशमुख, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच विवाहास उपस्थित भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत सवांद साधला. माणमधील संवादानंतर त्यांनी आज आपला मोर्चा फलटणकडे वळविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com