Madha Lok Sabha Election: मोदींची गॅरंटी की पवार-मोहिते पाटलांची जादू? सर्व्हेमुळे महायुतीत धाकधूक वाढली?

Madha Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत माढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोंदींची गॅरंटी चालणार की ज्येष्ठ नेते शरद पवार व विजयसिंह मोहिते-पाटील यांची जादू चालणार?
Madha Lok Sabha Election
Madha Lok Sabha ElectionEsakal

सोलापूर: सोलापू्र जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा कायमच माढा लोकसभा मतदारसंघातून ठरते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोंदींची गॅरंटी चालणार की ज्येष्ठ नेते शरद पवार व विजयसिंह मोहिते-पाटील यांची जादू चालणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. लोकसभेच्या निकालबाबत आतापर्यंत आलेल्या जवळपास सर्वच सर्वेमध्ये माढ्यात राष्ट्रवादीच्या तुतारीचाच निनाद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत माढ्यावरून धाकधूक वाढली आहे.

सोलापू्र जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ तर सातारा जिल्ह्यातील फलटण व माण या दोन विधानसभा मतदारसंघाचा माढा लोकसभेत समावेश होतो. या मतदारसंघातील सहाच्या सहा आमदार महायुतीचे आहेत.

फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या निंबाळकरांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध केल्याने? फलटणमध्ये काय? याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. माढा लोकसभेच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी राबलेल्या नेत्यांना या मतदारसंघातील निकालाबद्दल काय वाटते? याचा ‘सकाळ’च्या बातमदारांनी घेतलेला अंदाज.

Madha Lok Sabha Election
Loksabha Election Result : नागपूर आणि रामटेक मतदारसंघात मताधिक्य किती? शहर, ग्रामीणमध्ये चर्चांना उधाण

माढा लोकसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेसला लीडची शक्यता

माळशिरस, करमाळा, माढा

भाजपला लीडची शक्यता

फलटण, माण, सांगोला

अशा होणार मतमोजणीच्या फेऱ्या

करमाळा - २५. माढा - २५. सांगोला - २२. माळशिरस- २५. फलटण- २५. माण- २७.

Madha Lok Sabha Election
Pune Porsche Crash: ससून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे ते दोघे कोण? रक्ताच्या नमुन्याच्या अदलाबदली वरून संशय वाढला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com