Madha Lok Sabha Election: मोहिते पाटलांचं ठरलंय? अमोल कोल्हेंचं तुतारीच्या गजरात स्वागत, माढा लोकसभेबाबत ‘सकारात्मक’ चर्चा?

Madha Lok Sabha Election: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज अकलूज येथील मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर येत मोहिते-पाटील कुटुंबीयांची भेट घेतली.
Madha Lok Sabha Election
Madha Lok Sabha ElectionEsakal

Madha Lok Sabha Election: ’आमचं ठरलंय!’, म्हणत धैर्यशील हे तुतारी घेऊन रणांगणात उतरतील, असा इशारा जयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपला दिला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज अकलूज येथील मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर येत मोहिते-पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, मोहिते-पाटील कुटुंबाशी संवाद साधून महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत ‘सकारात्मक’ चर्चा झाल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी ‘एक्स’च्या आपल्या अधिकृत हँडलवरून दिली.

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी डावलल्यामुळे नाराज झालेल्या मोहिते-पाटील यांनी बंडाचे निशान फडकवले आहे. भाजपने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहिते पाटील यांची नाराजी दूर झालेली नाही. आता मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज अकलूज येथील मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर येत मोहिते कुटुंबीयांची भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला ते आले होते, असे सांगितले जात आहे.

Madha Lok Sabha Election
लोकसभेचं तिकीट मिळालं पण जातवैधता प्रमाणपत्र ठरलं रद्द; काँग्रेसच्या उमेदवाराचं भवितव्य धोक्यात

परंतु सध्याच्या राजकीय वातावरणामुळे ही भेट नक्की कशासाठी होती याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. अमोल कोल्हे आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोघांनीही राजकीय भाष्य करण्यास नकार दिला. शिवरत्न बंगल्यावर अमोल कोल्हे यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील आदी उपस्थित होते. या भेटीनंतर माढ्याचा खासदार म्हणत धैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे शरद पवारांसोबतचे बॅनर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मोहिते पाटलांचे तुतारी हाती घेण्याचे ठरल्याची चर्चा आहे.

Madha Lok Sabha Election
Navneet Rana: अमरावतीचं राजकारण तापलं! महायुतीत बंड होणार, अभिजीत अडसूळ नवनीत राणांना ठरणार नवा पर्याय?

माढा, सोलापूर आणि बारामती या तीन लोकसभा मतदारसंघावर मोहिते-पाटील परिवाराकडून राजकीयदृष्ट्या मोठा परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर सर्वच राजकीय पक्षांकडून आपापल्या गटाकडे खेचून घेण्याची मोठी स्पर्धा लागलेली दिसून येते. माढा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर केली.

Madha Lok Sabha Election
Shivsena UBT: पुरातत्व विभागाने केली उद्धव ठाकरेंची कोंडी! रात्री उशिरा दिली शिवनेरीवर हेलीकॉप्टर लॅन्डींगची परवानगी

त्या दिवसापासून शिवरत्न बंगल्यावर भाजपविरोधी बंडाची भाषा आणि भूमिका घेतली जात आहे. हे बंड यशस्वी करण्यासाठी किंवा मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीमधून उमेदवारी देण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न केले जात आहेत. मोहिते - पाटील परिवारातील सदस्यांकडून गावभेटी केल्या जात आहेत. गेल्याकाही दिवसांपासून अकलूज तसेच फलटण येथे बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात आज खासदार अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगल्यावर येऊन धैर्यशील मोहिते पाटील व इतरांशी चर्चा केली.

Madha Lok Sabha Election
IPS Sadanand Vasant Date NIA DG: सदानंद दाते असणार NIA चे नवीन प्रमुख; 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर आले होते चर्चेत..

प्रशांत परिचारक मोहिते पाटलांच्या भेटीला

माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूजमध्ये येऊन मोहिते पाटील यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र मोहिते पाटलांची नाराजी दूर झाली नाही. त्यानंतर आज (बुधवार) सकाळी मोहिते पाटील यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे माढा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी शिवरत्न बंगल्यावर पाठविण्यात आले होते. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, या भेटीत मोहिते पाटील यांचे बंड थंड व्हावेत या दृष्टीने परिचारक यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहेत.

Madha Lok Sabha Election
Navneet Rana: नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे बच्चू कडू यांना धक्का! महायुतीतून पडणार बाहेर? भूमिकेवर लक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com