esakal | खाद्यपदार्थांची दुकाने भरली ; किंमतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

SWEET home

खाद्यपदार्थांची दुकाने भरली ; किंमतीत 20 ते 30 टक्क्यांची वाढ

sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा ( जिल्हा - सोलापूर) : गौरी-गणपतीच्या सणासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची दुकाने माढा तालुक्यात सजली असून खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. सजावटीच्या सामानाची दुकानेही भरलेली असून ग्राहकांचा संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळत आहे.

माढा तालुक्यातील विविध हॉटेल व इतर ठिकाणी गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांची दुकाने थाटलेली आहेत. यावर्षी महागाईने खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आवश्यक अणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत तीस ते नव्वद टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झालेली आहे.

हेही वाचा: कामास गती न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर - चिमणराव पाटील

यामुळे खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्येही हॉटेल व्यवसायिकांनी 20 टक्‍क्‍यांनी ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केलेली दिसून येते. प्रत्यक्षात खाद्यपदार्थासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती या 30 ते 90 टक्के पर्यंत वाढलेल्या असल्या तरी हॉटेल व्यवसायिकांनी मात्र द्यपदार्थांची भाववाढ 30 टक्‍क्‍यांपर्यंत केलेली आहे ; असे असतानाही ग्राहकांनी मात्र या खाद्यपदार्थांच्या विक्रीकडे मागीलवर्षीच्या थोडीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये खाद्यपदार्थांच्या कच्चा मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे खाद्य पदार्थांची झालेली भाववाढ तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी असे खाद्यपदार्थ खरेदीकडे थोडी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. अर्थात सोमवारी (ता. 12) दुपारपर्यंत या विक्रीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा हॉटेल व्यवसायिकांना आहे.

हेही वाचा: प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके

खाद्यपदार्थांच्या दुकानाबरोबरच स्टेशनरी दुकानातही गौरी - गणपतीपुढे सजावटीसाठी लागणारे हार, लाईटच्या माळा, मुखवटे, आडणी, विविध खेळणी याची दुकानेही सामानाने भरून गेली आहेत. अशा दुकानातही ग्राहकांचा प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा आहे.

खाद्यपदार्थांचे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढलेले दर कंसात मागीलवर्षाचे एका किलोचे अंदाजे दर :

बुंदी लाडू 140 (120), मोतीचुर लाडू 200(180), बालूशाही 200 (160), जिलेबी 120 (100), गरा लाडू 160 (120), फरसान 200 (160), बेसन लाडू 200 (160), शंकरपाळी 200 (160), चकली 240 (200), अनारसे 240 (200), करंजी 240 (200).

loading image
go to top