

State-level committee approves ₹4,000 per ton subsidy for onion storage chawls, bringing relief to Maharashtra’s farmers.
Sakal
सोलापूर : राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळ प्रकल्प उभारणी प्रकल्प २०२५-२६ मध्ये राबविण्यासाठी तीन हजार ६१५ लाख रकमेच्या कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित मापदंडानुसार कांदा चाळ उभारणीसाठी प्रतिटन चार हजारांचे अनुदान मिळणार आहे. राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने हा निर्णय घेतला आहे.