

Crop Insurance Maharashtra Farmers to Receive Moong and Urad Payments from December 1 Soybean Payments from December 15
sakal
सोलापूर : दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमधील एक कोटींवर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्राकडे ३० हजार कोटींची मदत मागितली आहे. केंद्राची मदत येण्यापूर्वी दुष्काळाने बाधित शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळणार आहे. मूग व उडीद पिकांचा विमा १ डिसेंबरपासून, तर सोयाबीन पिकांचा विमा १५ ते २० डिसेंबरपासून वितरित होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.