

Maharashtra Farmers Compensation News 2026 Drought Relief Delayed as 290 Talukas Await Crop Damage Reports and Two Hectare Aid May Come in December
sakal
सोलापूर : दुष्काळाने बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश काढून महिना होत आहे; तरीदेखील वर्धा आणि वाशीम या दोन जिल्ह्यांचेच अहवाल शासनाला प्राप्त झाले आहेत. अजूनही २९० तालुक्यांचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना भरपाईसाठी आणखी एक ते दीड महिने वाट पाहावी लागू शकते, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.