
सोलापूर : येथील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीने शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार सोलापूर शहर- जिल्ह्यातील १५ शाळांमधील ३३ शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतांची चौकशी केली. त्यातील ज्यांच्या वैयक्तिक मान्यतेत अनियमितता झाली आहे, त्यांची मान्यता रद्द होणार असल्याचे उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. संबंधितांना बोलावून त्यांची सुनावणी घेतली असून त्यांच्या वैयक्तिक मान्यतांवर सप्टेंबरमध्ये अंतिम निर्णय होईल, असेही सांगण्यात आले.