
उ.सोलापूर : राज्यात गायीच्या दुधाच्या खरेदी दरात एक रुपयांची घट करण्यात आली आहे. शुष्ककाळात राज्यातील संस्थांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या तीन वर्षापासून राज्यात गायीच्या दुधाचे दर हे उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत. सरकार अनुदानाची तात्पुरती मलमपट्टी वगळता कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने दूध उत्पादकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.