
Endless Struggle for Farmers as Floods Destroy Crops and Livelihoods
Sakal
-गो. रा. कुंभार
नरखेड: ढग दाटलं, आभाळ फाटलं अन् शिवार भरून पाणी पडलंय. नद्या, नाले, ओढे पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. पोटच्या लेकरा पेक्षाही जिवापाड जपलेली पिकं डोळ्या देखत पाण्यात नासू लागली. त्यामुळे मुसळधार पावसाने नद्यांना महापूर असला तरीही न भूतो न भविष्यती अशा नुकसानीमुळे नद्यांच्या महापुरापेक्षा शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा महापूर मात्र थांबेना झालाय. असे वाळूज येथील शेतकरी सुधीर मोटे यांनी हृदय पिळवटून टाकणारे दुःख सकाळशी बोलताना व्यक्त केले.