
Maharashtra Crop Loss Ajit Pawar Speaks After Farmer Question
Esakal
सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे गेल्या दोन दिवसांपासून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. काही मार्ग बंद झाल्यानं संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावात पोहोचले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या.