
Flood-affected citizens of Solapur to receive ₹772 crore in financial aid; compensation deposits begin today.
Sakal
सोलापूर: ज्या पिकांच्या भरोश्यावर दिवाळी होणार होती तेच पीक महापूर अन् अतिवृष्टीत मातीमोल झाले. यंदाची दिवाळी कशी होणार? याचीच चिंता शेतकरी व त्याच्या कुटुंबाला लागली होती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने दिला होता. सरकारने दिलेला शब्द आज पूर्ण झाला असून जिल्ह्यातील ६ लाख ७८ हजार ५९२ शेतकऱ्यांसाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये आज दिले आहेत. दिवाळीपूर्वी सरकार शेतकऱ्यांवर प्रसन्न झाले आहे. लक्ष्मीपूजनापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर लक्ष्मी वर्ग करण्यासाठी महसूलची यंत्रणा आज दुपारपासूनच कामाला लागली आहे.