
Solapur villagers express anger as 58 villages excluded from Hyderabad Gazetteer training; state government criticized.
Sakal
सोलापूर : हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा-कुणबीच्या प्रमाणपत्राचा लाभ देण्यासाठी मराठवाड्यात गावपातळीवर समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमधील सदस्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा घेण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सुदाम आंधळे यांनी आज पत्र काढले. मराठवाड्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना काढलेल्या या पत्रामुळे येत्या काळात समिती सदस्यांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यावेळी निजाम राजवटीत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावांना मात्र राज्य शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. या गावातील समिती सदस्यांसाठी कोणतेही प्रशिक्षण नसल्याने ५८ गावातील नागरिकांना पुन्हा एकदा संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे.