हॉटेल, ट्रॅव्हल्स, लॉजिंग व्यवसायाला मिळणार बूस्ट

मंदिरे सुरु करण्याचा निर्णय अध्यात्मिक पर्यटनाला पोषक
हॉटेल, ट्रॅव्हल्स, लॉजिंग व्यवसायाला मिळणार बूस्ट
हॉटेल, ट्रॅव्हल्स, लॉजिंग व्यवसायाला मिळणार बूस्ट

सोलापूर : अध्यात्मिक पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याला मंदिरे सुरु करण्याच्या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. पर्यटनाशी निगडीत असलेल्या हॉटेल, लॉजिंग, ट्रॅव्हल्स, सोलापुरी उत्पादने विक्री, मंदिर परिसरातील विक्रेते यांना बूस्ट मिळणार आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे खुली होणार असल्याने पंढरपूर, अक्कलकोट येथील व्यावसायिकांची मरगळ दूर होण्याची शक्‍यता आहे.

कोरोनामुळे जवळपास दीड ते दोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने पंढरपूर, अक्कलकोट या महत्वाच्या धार्मिक ठिकाणी येणाऱ्या भाविकांचा ओढा कमी झाला होता. त्यामुळे येथील बाजारपेठा ओस पडल्या होत्या. पंढरपूर व अक्कलकोटला आलेले भाविक पुढे तुळजापूर, कोल्हापूर, गाणगापूर, शिर्डी या ठिकाणी जात असल्याने जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायही फारसा तेजीत नव्हता. मंदिरे सुरु होणार असल्याने पर्यटनाशी निगडीत असलेल्या व्यावसायांना आता चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ठळक बाबी

पंढरपूर, अक्कलकोटला येतात लाखो भाविक दोन वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्‍यता सोलापुरात पर्यटक थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्‍यकता जिल्ह्यातील अध्यात्मिक पर्यटनाचे टुरिझम सर्किट करणे आवश्‍यक महामार्गाच्या चौपदरीकरणांमुळे भक्तांचा प्रवास सुलभ

हॉटेल, ट्रॅव्हल्स, लॉजिंग व्यवसायाला मिळणार बूस्ट
सोलापूर पोलिस आयुक्‍तालयाचा होणार विस्तार: गृहराज्यमंत्री

श्री. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी विविध भागातून लाखो भाविक येतात. अनेक महत्त्वाच्या सणांमध्ये भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आलेला नाही. ७ ऑक्‍टोंबरपासून मंदिरे सुरु होणार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्‍यता आहे. कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन भक्तांसाठी दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अक्कलकोटला येणारे बहुतांश भाविक गाणगापूरला जात असल्याने अक्कलकोट तालुक्‍यातील अर्थव्यवस्थेला पर्यटनाच्या माध्यमातून मोठा हातभार लागत आहेत.

- महेश इंगळे, अध्यक्ष, वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोट

हॉटेल, ट्रॅव्हल्स, लॉजिंग व्यवसायाला मिळणार बूस्ट
"राजकारणात माणसं कमविण्यासाठी आलोय, पद नशिबाने मिळेल"

श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दरवर्षी सुमारे एक कोटीहून अधिक भाविक येतात. कोरोनामुळे गेल्या सुमारे दीड वर्षापासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवावे लागले. त्यामुळे देणगीच्या माध्यमातून मंदिर समितीला मिळणारे सुमारे ३३ कोटी रुपये मिळू शकलेले नाहीत. याच काळात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अन्नदान व अन्य सामाजिक उपक्रमांसाठी मंदिर समितीने सुमारे तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. ७ ऑक्‍टोबरपासून मंदिरात भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतील. पंढरपूरच्या बाजारपेठेतदेखील पूर्वीप्रमाणे उलाढाल सुरू होईल.

- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समिती, पंढरपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com