
पंढरपूर : शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जीकरण केले जाणार आहे. येत्या ५ वर्षात कृषी क्षेत्रात दरवर्षी पाच हजार, अशी २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.