

Fruit orchards in Maharashtra severely affected by ‘Two-Four-D’ chemical drift; grape growers demand immediate statewide ban.
Sakal
सोलापूर : उसासह वेगवेगळ्या पिकांतील तण नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सर्रास ‘टुफोरडी’ या तणनाशकाचा वापर केला जातो. दरवर्षी त्याचा सोलापूरसह राज्यभरातील द्राक्षासह फळबागांचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यामुळे टुफोरडीवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचे चित्र दिसून येत आहे.