
Minister Jayakumar Gore
पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भीमा, सीना नदीसह अनेक ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पुराच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानी संदर्भात व पूरस्थिती बाबत उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपुरात बोलताना दिली.