
सोलापूर : मागील २७ वर्षांपासून अंशत: अनुदानावरील शाळांमध्ये अध्यापनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शिक्षकांना अजूनही पूर्ण पगार मिळालेला नाही. २०१४ मध्ये नैसर्गिक वाढीसंदर्भातील शासन निर्णय निघाला, तरीदेखील ११ वर्षात शाळांना २० टक्केच अनुदान मिळाले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांना अजूनही पूर्ण पगाराची प्रतीक्षाच आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी मंगळवारपासून शाळा बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला आहे. रास्त मागणीसाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे, पण शासनाने निर्णय न घेतल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.