पंढरपुरात मंदिर उघडल्यानंतर भाजपचा टाळ-मृदंगाच्या गजरात जल्लोष

मागील दीड वर्षापासून बंद असलेलं विठ्ठल रुक्‍मिणीचे मंदिर मंगळवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुले करण्यात आले.
pandhapur temple
pandhapur templesakal News

पंढरपूर (सोलापूर) : मागील दीड वर्षापासून बंद असलेलं विठ्ठल रुक्‍मिणीचे मंदिर मंगळवारी (ता.7) घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुले करण्यात आले. याचा आनंद म्हणून भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आध्यमिक आघाडीच्या वतीने टाळ मृदंग आणि विठुनामाच्या जयघोषात जल्लोष साजरा केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षापासून विठुरायाच्या मंदिरासह राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर भाजपच्या वतीने धार्मिक मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत. या मागणीसाठी आंदोलने केली होती. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न देखील केला होता. त्यानंतर भाजपचे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरसह राज्यभरातील मंदिरे दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेत आज मंदिरे खुले केल्यानंतर पंढरपुरात भाजप आध्यात्मिक आघाडीच्यावतीने वारकरी दिंडी काढून आनंद उत्सव साजरा केला. येथील ज्ञानेश्वर महाराज जोगदंड वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात व विठुनामाच्या जयघोषात दिंडी काढली. त्यानंतर संत नामदेव पायरीजवळ जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्‍याची आतषबाजी केली. भाविकांना प्रसादाचे वाटप करुन आनंद साजरा केला.

यावेळी भाजपचे आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे यांनीही नामदेव पायरी येथे.येवून दिंडीत सहभागी होत आनंद साजरा केला. यावेळी लक्ष्मण धनवडे, चांगदेव कांबळे, प्रणव परिचारक, सोमनाथ आवताडे, सुभाष मस्के, बादलसिंह ठाकूर, भास्कर कसगावडे, विक्रम शिरसट आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com