सोलापूर : ‘आमच्या कुटुंबात दोन सुना, पण त्या वेगळ्या राहतात, रेशनकार्डवर मुलीचे नाव आहे पण आता तिचा विवाह झाला आहे, आमच्या कुटुंबात तिघींनी अर्ज केला पण एकीला आतापर्यंत लाभच मिळाला नाही’ अशी तोंडी उत्तरे लाभार्थी कुटुंबीयांकडून अंगणवाडी सेविकांना दिली जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने पाठविलेल्या २६ लाख अपात्र लाभार्थींच्या पडताळणीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.