
सोलापूर: १९९० मध्ये बृहन्मठ होटगी संस्थानचे श्री ष.ब्र.तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. अक्कलकोट रस्त्यावर दक्षिणोत्तर १२५ फूट लांब तर पूर्व-पश्चिम ८५ फूट रुंद असे हे मंदिर आहे. एकूण तीन भागात हे मंदिर बांधण्यात आले.