"या' योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार !

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर होणार मोफत उपचार
mucor-mycosis
mucor-mycosis File Photo
Summary

युनायटेड हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून सुरवातीला दीड लाख तर त्यानंतरचा उपचाराचा खर्च महात्मा फुले सोसायटीकडून केला जाणार आहे.

सोलापूर : म्युकरमायकोसिस (mucormycosis) झालेल्या रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना (Mahatma Phule Jan Arogya Yojana) लागू करण्यात आली आहे. दीड लाखापर्यंतचा खर्च युनायटेड इन्शुरन्स (United Insurance) कंपनीकडून तर उर्वरित खर्च योजनेच्या महात्मा फुले सोसायटीतून दिला जात आहे. मात्र, शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) याशिवाय अन्य कोणत्याही रुग्णालयात ही योजना सुरू झालेली नाही. त्यामुळे रुग्णांना पदरमोड करूनच उपचार घ्यावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. (Mahatma Phule Jan Arogya Yojana will provide free treatment to patients with mucormycosis)

mucor-mycosis
कोरोनातून बरे झालेल्यांना घेता येईल तीन महिन्यांनंतर लस !

कोरोनातून (Covid-19) बरे झालेल्या मधुमेह असणाऱ्या रुग्णांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा धोका वाढला आहे. सद्य:स्थितीत शहर व जिल्ह्यातील 216 रुग्णांना हा आजार झाला असून त्यातील 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावरील उपचार घेताना ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरवरील रुग्ण, ज्यांना शुगर जास्त आहे अशांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पुढील शंभर दिवस नियमित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे. शहरातील व ग्रामीण भागातील 14 रुग्णांचा बळी या आजाराने घेतला आहे. म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण 8 मे रोजी आढळला होता. मागील 17 दिवसांत ही रुग्णसंख्या तब्बल 216 झाली असून, त्यातील 51 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. हा आजार होऊ नये म्हणून रुग्णालयांसह रुग्णांनीही आरोग्याची व स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

mucor-mycosis
महापालिकेने केला चारवेळा सर्व्हे, तरीही रोखला नाही कोरोना !

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना दीड लाखाची मदत केली जाते. तर उर्वरित उपचाराचा खर्च महात्मा फुले सोसायटीतून दिला जाणार आहे. सध्या शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमधूनच या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात असून, आणखी तीन रुग्णालयांचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.

- डॉ. दीपक वाघमारे, जिल्हा समन्वयक, जनआरोग्य योजना, सोलापूर

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची सद्य:स्थिती

  • एकूण रुग्ण : 216

  • मृत्यू : 14

  • बरे झालेले रुग्ण : 51

  • उपचार घेणारे रुग्ण : 151

तीन रुग्णालयांचा प्रस्ताव शासन दरबारी

म्युकरमायकोसिस हा आजार संसर्गजन्य नसून, कोरोना झाल्यानंतर अनेक दिवस ऑक्‍सिजन व व्हेंटिलेटरद्वारे उपचार घेणाऱ्या व मधुमेह असलेल्या रुग्णांना त्याचा धोका सर्वाधिक आहे. या रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून त्यांच्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यासाठी योजनेअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून (सिव्हिल हॉस्पिटल) या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. तर उपचाराची संपूर्ण सोय असलेल्या शहरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालय, यशोधरा व अश्‍विनी ग्रामीण कुंभारी हॉस्पिटलचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, त्यावर अजून निर्णय झाला नसल्याची माहिती जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. दीपक वाघमारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com