esakal | शिवसेना आमदार सावंतांविरुद्ध पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीच तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना आमदार सावंतांविरुद्ध पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीच तक्रार!

शिवसेनेचे आमदार तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.

शिवसेना आमदार सावंतांविरुद्ध पक्षाच्या पदाधिकाऱ्याचीच तक्रार!

sakal_logo
By
अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant)) यांच्या विरोधात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे (Mahesh Chivte) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार केली आहे. आमदार तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे थकवले आहेत. ते थकीत पैसे त्वरित द्यावेत अशी सूचना करावी, असे पत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

हेही वाचा: करमाळा बाजार समिती सचिवपदी क्षीरसागर! बंडगर, बागल गटाला धक्का

विहाळ (ता. करमाळा) येथील भैरवनाथ शुगर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत देणी त्वरित द्यावीत, अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे सोलापूर उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे. याबाबत आमदार प्रा. तानाजी सावंत यांना शेतकरीहित डोळ्यासमोर ठेवून सूचना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. भैरवनाथ शुगर कारखान्याने 2018-19 मध्ये शेतकऱ्यांना उसाला 2 हजार 200 रुपये दर देतो म्हणून ऊस खरेदी केला. यावर्षी पहिल्या दोन महिन्यात गाळपासाठी आलेल्या उसाला शेतकऱ्यांना 2 हजार 200 रुपये दर दिला. मात्र त्यानंतर या कारखान्याने शेतकऱ्यांना 1800 रुपये दर दिला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर 136 रुपयाने उर्वरित पेमेंट दिले. आता जवळपास शेतकऱ्यांचे एक लाख 30 हजार मेट्रिक टनाचे प्रतिटन 266 रुपयांप्रमाणे जवळपास 4 कोटी 50 लाख रुपयांची देणे थकली आहेत, असे चिवटे यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: दमदार पावसामुळे सीना नदीवरील चार बंधारे पाण्याखाली !

जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची देणी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. या कारखान्यासमोर वारंवार शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सुद्धा पैसे दिले जात नाहीत. याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना यांनी आंदोलने केली आहेत. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी करून परत पाठवले जात असल्याने येथे सावंत हे शेतकऱ्यांवर दडपशाही करत असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

loading image
go to top