

Police remove illegal encroachments from Mahud’s main chowk; locals breathe easy as traffic returns to normal.
Sakal
महूद : दोन महामार्ग होऊनही महूदमधील चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे महूद ग्रामस्थ कमालीचे त्रासले असून, प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. याबाबत सोमवारी (ता. १०) ‘सकाळ’मध्ये प्रकाशित होताच पोलिस प्रशासनाने महूद येथील मुख्य चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून टाकली आहेत. त्यामुळे काही अंशी चौकाने मोकळा श्वास घेतला असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.