

Solapur Crime
Sakal
वैराग : वैराग येथे अवैधरीत्या अफू हा अमली पदार्थ विक्री करण्याकरिता आणल्यावर पोलिसांना मिळून आल्याने दोघांवर वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना बार्शी न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.