

Modnimb Industrial Growth on Track: Shinde Brothers Meet Revenue & Forest Ministers
Sakal
मोडनिंब : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह शिंदे यांनी आणि त्यांचे बंधू विक्रमसिंह यांनी मोडनिंबच्या एमआयडीसीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. पालकमंत्र्यांच्या समवेत झालेल्या याभेटीमुळे मोडनिंब औद्योगिक वसाहतीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भूसंपादन प्रक्रिया सुरू करून पुढील प्रक्रियेसाठी नागपूर येथेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री जयकुमार गोरे व संबंधित अधिकारी यांची बैठक होत असल्याची माहिती भाजपचे रणजितसिंह शिंदे यांनी दिली.