
सोलापूर: मुंबईतून एमडी ड्रग्ज सोलापुरात आणून कलबुर्गी व सोलापूर शहराजवळील गावांमध्ये पुरवठा करणाऱ्या आठ जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ते संशयित आरोपी मुंबईतून नेमके कोणाकडून व कोणत्या भागातून ते ड्रग्ज घेत होते, याच्या शोधासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. त्यातून ड्रग्ज पुरवठ्याचे मोठे रॅकेट समोर येईल, असे अधिकारी सांगत आहेत.