

Sudhir Khartmal joins NCP; senior leader Baliram Sathe’s entry soon, Ajit Pawar to visit Solapur for party expansion.
Sakal
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वरळी डोम (एनएससीआय) येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांनी बुधवारी सह्याद्री अतिथिगृहावर उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत साठे यांचा लवकरच प्रवेश होणार आहे.