
सोलापूर : सोलापूर- हैदराबाद रोडवरील बोरामणीजवळील शिवराम मंगल कार्यालयासमोर बुधवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास भरधाव बस (केए ३८, एफ १२१२) व कंटेनरचा (जीजे १२, बीझेड ७३९०) अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नसून बसमधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात अक्षरश: कर्नाटक बसचा एका बाजूचा पत्रा पूर्णपणे फाटला होता.