

Nomination Scrapped After Objection on Forged Signature; BJP Rival Still Uncertain
sakal
सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावरील सूचक म्हणून केलेली माझी सही बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्र खुद्द नगरसेवक नागेश भोसले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज छाननीत बाद ठरवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपविरोधातील उमेदवार कोण असणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर दुसरीकडे नगरसेवक भोसले यांच्या एका सहीने ६०० हून अधिक मतदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. या प्रकरणानंतर काँग्रेस व भाजपमधील वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.