

Court Decision in Beed Suicide Case: Dancer Pooja Gaikwad Gets Bail
Sakal
सोलापूर : बीड जिल्ह्यातील लुखामसला (ता. गेवराई) गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी ९ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणात नर्तिका पुजा गायकवाड (रा. सासुरे, ता. बार्शी) हिच्याविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तिला अटक केली होती. तिची बार्शी सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. २४) जामिनावर मुक्तता केली.