
- संतोष पाटील
टेंभुर्णी : वाघाची कातडी व हस्ती दंत तस्करी करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या टेंभुर्णीतील ढवळेनगर येथील एका घरावर सोलापूर ग्रामीण पोलीस, टेंभुर्णी पोलीस व वन विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून या घरातून एका प्लॅस्टीकचे पिशवीमध्ये वाघ सदृश्य वन्यजिव प्राण्याचे सोलून काढलेले कडक झालेले सुकविलेले अंदाजेअडीच लाख रूपये किंमतीचे कातडे व अंदाजे एक लाख रूपये किंमतीचा एक हस्तीदंत असा एकूण सुमारे साडेतीन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या पोलीसांनी हा छापा टाकला. याप्रकरणी एका संशयित आरोपीस पोलीसांनी अटक केली केली असून माढा न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.