
सोलापूर : मालेगाव बॉम्बस्फोटातील सात संशयित आरोपींची मुंबईतील विशेष एनआयए (राष्ट्रीय तपास संस्था) न्यायालयाने तब्बल १७ वर्षांनंतर पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या ‘एटीएस’च्या एका पथकातील पोलिस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी या प्रकरणावर मोठे भाष्य केले आहे. ‘सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश त्यावेळी मला देण्यात आले होते,’ असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. तसेच मला खोटा तपास करायलादेखील त्यावेळी सांगण्यात आले होते, असेही ते म्हणाले.