
Flood Survivor in Kevad Clings to Tree for 14 Hours;
Sakal
-किरण चव्हाण
माढा: माढा तालुक्यात सीना नदीला आलेल्या पुरामुळे केवड गावात झाडावर आसरा घेऊन बसलेल्या व्यक्तीला रेस्क्यू टीमने मंगळवारी मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुखरूप बाहेर काढले. कुबेर नामदेव धर्मे या ज्येष्ठ व्यक्तीने तब्बल १४ तास संपूर्ण पुराच्या पाण्याने वेढलेल्या झाडावर बसून धाडसाने संघर्ष करत काढले.