बार्शी: सासुरे (ता. बार्शी) येथील गोळीबार प्रकरणातील मृत उपसरपंच गोविंद बर्गे व नर्तिका पूजा गायकवाड यांचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, बार्शी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लातूर रस्त्यावरील जामगाव आवटे येथील रेणुका कला केंद्राच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.