

Shiv Sena Submits Memorandum on Farmers' Crop Damage in Mangalvedha
Sakal
मंगळवेढा : तालुक्यातील पावसामुळे बाधित झालेल्या व नुकसान भरपाई पासून वंचित शेतकऱ्याचे पंचनामे करण्यासह मका पिकाचे हमीभाव केंद्र सुरू करावे या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेनेच निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे न्याय मागितला. याबाबत मागणीची निवेदन निवासी नायब तहसीलदार यांनी स्वीकारले.यावेळी शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे, शेतकरी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय गेजगे,जिल्हा अध्यक्ष रामचंद्र जाधव ,जिल्हा संघटक राजकुमार स्वामी, मारुती वाघमारे, बालाजी धनवे, सुरेश वाघमोडे, अमोगसिद्ध काकणकी,चेतन वाघमोड, मधुकर कोटे, कृष्णा सोमूत्ते,विठ्ठल पडवळे,नवनाथ सिरसटकर,युवराज म्हेत्रे,महेश तळ्ळे,अजित टकले, बबन मुंगसे,बाबा इनामदार, ग्रामपंचायत सदस्य चणवीर लंगोटे, नागनाथ म्हमाने, दत्तात्रय कोरे,दादा तुकाराम बंडगर,कल्पेश मोटे,बाळासाहेब डांगे, सुरेश डांगे, दादा मोठे, तानाजी डांगे.