अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला भूसंपादनातील मोबदल्यावरून प्रहारचे उपोषण

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील संपादन केलेल्या काही शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला दिला नाही
Mangalvedha region Office Protest for Compensation in land acquisition by Prahar Sangathan
Mangalvedha region Office Protest for Compensation in land acquisition by Prahar Sangathan

मंगळवेढा - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तालुक्यात प्रभावी राबविले जात असतानाच चक्क हक्काच्या भूसंपादनातील मोबदल्यावरून प्रहार संघटनेच्यावतीने मंगळवेढ्यातील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवरील भुसंपादनातील अन्यायाविरुद्ध स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपोषणाचे हत्यार उपसल्याने खळबळ उडाली. यामध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील संपादन केलेल्या काही शेतकऱ्यांना आजतागायत मोबदला दिला नाही व ज्या शेतकऱ्यांना मोबदला दिला गेला आहे त्या शेतकऱ्यांकडून ठराविक टक्केवारी घेऊन मोबदला दिला गेला आहे. तसेच मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील जे काही शेतकऱ्यांना मोबदला वाटप केले आहे त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात अफरातफर केली असून संबंधित अधिकाऱ्यांवरती आजपर्यंत कारवाई करण्यात आली नाही.

प्रांत कार्यालयातील एजंट व अधिकारी वर्गानी संगनमताने आंधळगाव येथील सरकारी जमीन खाजगी दाखवून मोबदला लुटला असून संबंधित अधिकारी, पुढारी व एजंट वर कोणत्याही प्रकारची आजतागायत कोणत्याही प्रकारची कारवाई केली आली नाही तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून आंधळगाव येथील जमीनीची अनाधिकृत पणे मोजणी करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली म्हणून प्रांत व भूमी अभिलेख अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. टक्केवारी साठी वर्ग 2 जमीनी वर्ग 1 केल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या वतीने करत उपोषणाचे हत्यार उपसले.यावेळी सिदराया माळी,श्रीपाद पाटील,तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे,संतोष पवार, राकेश पाटील, रोहिदास कांबळे, युवराज टेकाळे, राहुल खांडेकर, नवनाथ मासाळ, अनिल दोंडमिसे, नागेश मुदगुल ,दिलावर मुजावर,बाळु वाघमारे,बिरू शिंदे,प्रकाश शिंदे ,निलेश कांबळे, मच्छिंद्र कांबळे व पिडीत शेतकरी बांधव उपस्थित होते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना मंगळवेढ्यातील महामार्गावरील भूसंपादित लोकांसाठी त्यांच्या मोबदल्यावरून उपोषणाच्या हत्यार उपसावे लागते. हा चिंतेचा विषय असून या मोबदला महसूल खात्याची निगडित असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून महसूल खात्याकडील चालढकल व दिरंगाईमुळे प्रलंबित राहिला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे चोखामेळा स्मारक समितीच्या पाहणी दौऱ्या दरम्यान मंगळवेढ्यात आले असता त्यावेळी देखील हा प्रश्न त्यांच्या कानावर घातला असता सोलापुरात स्वतंत्र बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांचे आश्वासन देखील आश्वासनच ठरल्याचे बोलले जात आहे.

महसूल खात्याकडून आंधळगाव येथे मोबदला वाटताना कमी जास्त झाले असून त्या संदर्भात जास्तीचे रक्कम वसूली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर न्यायप्रविष्ठ प्रकरणाचा मोबदला प्रलंबित असून कार्यालयामध्ये मोबदल्यासाठी आर्थिक लूट केली जात नसल्याचे सांगून 6 गावातील प्रस्तावावर अल्पसंख्यांक मंत्र्यांची स्थगिती असल्याने त्या गावचा मोबदला प्रलंबित असल्याचे महसूल खात्याकडून लेखी कळविण्यात आले. मात्र या खुलासावर असमाधान व्यक्त करत प्रहार चे कार्यकर्ते ठाम राहत उपोषण कायम ठेवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com