
Collapsed wall in Dhavalsam, Mangalvedha after heavy rain, claiming the life of a student.
Sakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात गेली दहा दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी कासावीस झाला. असतानाच तालुक्यातील ढवळस येथे पावसाने भिजलेली भिंत अंगावर कोसळून योगीराज जगन्नाथ हेंबाडे वय 11 याचा मृत्यू उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर त्याची बहीण जागृती हेंबाडे ही जखमी असून हिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.