Mangalwedha Crime : गुटख्यासह 17 लाख वीस हजाराचा ऐवज हस्तगत

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाची कारवाई
Crime
Crimesakal

मंगळवेढा - अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत महिद्रा पिकअप व गुटक्यासह 17 लाख 20 हजाराचा ऐवज हस्त करण्यात आला असून, याप्रकरणी पंढरपुरातील दोघा वाहन चालक व मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी सहाय्यक आयुक्त उमेश भुसे यांनी दिली असून संदीप रामचंद्र लाड (वय-36, रा. गोकुळ नगर, पंढरपूर) व भूषण बाळासाहेब होमकर (रा. पंढरपूर) हे आज पहाटे 6:30 वा. येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ब्रिजच्या खाली महिंद्रा पिकअप (वाहन क्रमांक एमएच १३ डिके 2639) मधून गुटखा येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना लागले त्यांनी तात्काळ आपल्या पोलीस कर्मचाऱ्यासह रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली सापळा लावला असता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिंद्रा पिकअपमधून विमल पान मसाला पाच पोत्यातील हजार पाकिटे.

एका पाकिटाची किंमत 198 प्रमाणे एक लाख 98 हजार, व्ही वन सुगंधित सुपारी मोठा जप साठा एक हजार पाकिटाचे एक पोते किंमत 22 हजार ,विमल पान मसाला 6000 पाकिटे,एका पाकिटाची किंमत 120 प्रमाणे 7 लाख 20 हजार व महिद्रा पिकअप 6 लाख, 17 लाख 20 हजार जप्त केला असून, वाहनचालक संदीप रामचंद्र लाड व वाहन मालक भूषण बाळासाहेब होमकर (रा. पंढरपूर) त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. पहाटेच्या दरम्यान केलेल्या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्यासह संभाजी आगलावे, राजू आवटे, तेजस मोरे हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com